तंत्रस्नेही शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा
💿💿तंत्रस्नेही शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा दि.27 व २८ ऑक्टोंबर 📀📀
🎈 💻जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, बुलडाणा💻🎈
पहिला दिवस (दि 27.10.2015)
🔵प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम २०१२ मध्ये प्रस्तावनेतच म्हटले आहे की शिक्षकाची भूमिका बदलून ती 'सुलभकाची' झालेली आहे. शिकणे सोपे व्हावे, ओझे कमी व्हावे व अध्ययनासाठी विविध व विपूल शैक्षणिक साधनांचा वापर कल्पकतेने व्हावा. जग झपाट्याने बदलते आहे. तंत्रज्ञान गुणाकाराच्या पटीत बदलत आहे. आपला शिक्षक मात्र या वेगात मागे पडतो आहे.शैक्षणिक साधन म्हणून तंत्रस्नेही होणे गरजेचे आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या सूचनेनुसार techonoteacher.in या वेबसाईट नोंदणी केलेल्या शिक्षकासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था बुलडाणा येथे गरजेनुसार २दिवसांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली
🔵 राज्यस्तरावरील तंत्रस्नेही कार्यशाळेत सहभागी शिक्षकांना आपले ज्ञान जिल्हास्तरावर संप्रेषित करण्यासाठी हे आयोजन करण्यात आले.
🔴कार्यक्रमाचे उद्घाटन मा.प्राचार्य कांबळे सरांनी केले, प्रास्ताविक मा.डुकरे सरांनी केले. कांबळे सरांनी आजचा विद्यार्थी वसमाज कसा तंत्रज्ञान वेगाने स्वीकारतो आहे हे स्पष्ट केले. शिक्षक तंत्रस्नेहीच नव्हे तर 'तंत्रसेवी ' सुद्धा झाला पाहीजे, हे स्पष्ट केले. तंत्रस्नेही चळवळीत उपक्रमशील शिक्षकांनी दिलेले योगदान कसलेही तांत्रिक शिक्षण न घेताही किती क्रांतिकारक आहे हे स्पष्ट केले . इच्छाशक्ती व दृष्ट्या अधिका-यांच्या साथीने महाराष्ट्र शिक्षण पद्धतीत क्रांती घडवून आणेल असा विश्वास मा.कांबळे सरांनी व्यक्त केला. एक ' संदीप गुंड' नव्हे तर प्रत्येक शाळेत 'संदीप गुंड' (digital school pastepada )बनले पाहीजे असे आवाहन सरांनी केले मोबाईल चा शैक्षणिक उपयोग मान्य करणारे व शिक्षकांना सतत ऊर्जा देणारे मा.प्रधान सचिव नंदकूमार साहेब यांचे स्फूर्तीदायक मनोगत (DCPS Buldana प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र आढावा बैठक) प्रोजेक्टर वर संकलित रुपात दाखवण्यात आले. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रासाठी तंत्रज्ञान कसे वापरता येईल यावर कांबळे सरांनी प्रकाश टाकला.
🔵मा. डुकरे सरांनी " एखादी गोष्ट सर्वसामान्य होते तेव्हा त्यातलं नाविन्य संपून ती सहज होते" असे सांगत मुलांना mobile, laptop मुक्तपणे का हाताळू द्यावं ते सोदाहरण सांगितले. 🔵उपस्थित तंत्रस्नेही शिक्षकांनी अल्प परिचय व कार्यशाळेला का आलो ते सांगितले. तद्नंतर मुख्य मार्गदर्शक मा.नादरकर सर यांनी सुत्रे हाती घेतली. कार्यक्रमाचे स्वरूप व वेळेचे नियोजन प्रोजेक्टर वर स्पष्ट केले.
🔵प्रथम दिवस - part A- Mobile या विषयांतर्गत 1)whatsapp 2) email 3)memory card 4) internet 5) apps part B- video editing असे नियोजन केलेले होते.
🔵 मोबाईल चा social media माहिती केवळ share करण्यासाठी नव्हे तर एकप्रभावी मंच म्हणूनही करता येईल. माहित नसलेले, शंका असलेले whatsapp चे नवनवे उपयोग मार्गदर्शक व उपस्थित शिक्षकांनी सोपेपणाने स्पष्ट केले. Whatsapp चा डाटा कसा बँकअप घ्यावा? मेसेज broadcast कसे करावे?
Whatsapp web ने computer वर कसे whatsapp वापरावे? अशा व अनेक प्रश्नांची माहिती आंतरक्रियेतून अधिक स्पष्ट झाली.
🔵 Gmail, browser, YouTube, व स्वत: video बनवणे हे प्रात्यक्षिकासह स्पष्ट करण्यात आले. मोबाईल चा उपयोग करून अतिशय सुरेख video उपस्थित शिक्षकांनीकरून दाखवले. Slideshow, video effects यांचे apps व software यांची देवाणघेवाण झाली.
🔵मार्गदर्शन रविंद्र नादरकर व डी बी कुटे यांनी केले
🔵वेळेचं अक्षरशः भान हरवून पहिला भरगच्च दिवस पूर्ण झाला. मन:पूर्वक धन्यवाद!!!!! 💿💽शब्दांकन 💽📀
संदीप विष्णू राऊत, पं स बुलडाणा जि बुलडाणा

0 Comments:
Post a Comment
आपल्या प्रतिक्रिया आम्हाला बळ देतात .
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home