ज्ञानरचनावादाची अध्ययन वर्ग व cd विमोचन
ज्ञानरचनावादी अध्ययन वर्ग व CD विमोचन - दि ५.११.२००५
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, बुलडाणा
स्थळ - जिल्हा नियोजन सभागृह बुलडाणा
मा.प्रधान सचिव नंदकूमार साहेब यांच्या आढावा बैठकीनंतर कुमठे बीट ला प्रत्यक्ष अनुभव घेऊन आलेल्या टिमचे अनुभव व ते digital स्वरुपात सर्वांना अनुभवता यावे यासाठी cd चे अनावरन असे आजच्या कार्यक्रमाचे आयोजन होते. कार्यक्रमाला मा विभागीय आयुक्त श्री राजूरकर साहेब , मा CEO Buldana दिपा मुधोळ मॅडम, मा प्राचार्य कांबळे सर DIET Buldana, मा Ad.Collector टाकसाळे साहेब, मा शिक्षणाधिकारी वैशाली ठग मॅडम, मा जि प अध्यक्षा, मा उपाध्यक्ष, मा सभापती(बुलडाणा, मेहकर,संग्रामपूर,दे.राजा ), मा शि.वि.अधिकारी व केंद्रप्रमुख, पत्रकार व technosavy शिक्षक प्रामुख्याने उपस्थित होते.
दीप प्रज्वलनानंतर cd चे मान्यवरांच्या हस्ते विमोचन व पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले. मा गवई सर (DIET Buldana) यांनी सुत्रसंचालन करत आजच्या कार्यक्रमाची रुपरेखा सांगितली.
मान्यवरांच्या मौलीक भाषणानंतर मा मुधोळ मॅडम यांनी आपल्या मनोगतात " फुकट मिळणारं शिक्षण व सुविधा नाकारून विद्यार्थी महागड्या खाजगी शाळेत का प्रवेश घेतात? आत्महत्या व दुष्काळात असणारे पालक खाजगी कडे का वळतात? ह्या विरोधाभासाबद्दल स्वत: आपण चिंतन करा" असे कळकळीचे आवाहन केले. मा प्राचार्य कांबळे सरांनी कुमठे बीट च्या यशाची कारणमीमांसा करत आपली आव्हाने काय आहेत, आपली कार्यपद्धती कशी असेल याबद्दल मार्गदर्शन केले. ज्या शाळांनी अशी सुरूवात केली त्यांचे अभिनंदन व शुभेच्छा दिल्या. मा शिक्षणाधिकारी ठग मॅडम म्हणाल्या की आपल्या रोजच्या जगण्यात, क्षणाक्षणात ज्ञानरचनावादाचा प्रत्यय येत असतो, आपल्या कर्तृत्वाची फळे या जन्मी आपल्याला लाभतात. शाळाबाह्य, भटकंती करणा-या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उपाय सुचवले. मान्यवरांनी आपल्या मनोगतामध्ये मानसिकता सकारात्मक करून सचोटीच्या प्रयत्नांवर भर देण्याची व मातृहृदयी होऊन मुलांमध्ये मिसळण्याची गरज प्रतिपादीत केली.
विरामानंतर अभ्यास दौरा केलेल्या व त्यानूसार आपल्या शाळेवर बदल केलेल्या शिक्षकांचे मनोगत घेतल्या गेले.

0 Comments:
Post a Comment
आपल्या प्रतिक्रिया आम्हाला बळ देतात .
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home