Monday, February 25, 2019

प्रगती वाचनालयात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी भाषेत ब्लाॅग लेखनाची मोफत कार्यशाळा

प्रगती वाचनालयात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी भाषेत ब्लाॅग लेखनाची मोफत कार्यशाळा


Monday, February 25, 2019  70


बुलडाणा - मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने बुधवार २७ फेब्रुवारीला सायंकाळी सात वाजता प्रगती सार्वजनिक वाचनालयाच्या पुढाकाराने दैनिक दिव्य मराठीच्या विशेष सहकार्याने मराठी भाषेमध्ये ब्लॉग लेखन करण्याची मोफत कार्यशाळा वाचनालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. आज जागतिक पातळीवर ज्ञान व अनुभव प्रसारीत करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ब्लॉग लेखन करण्यात येते, परंतु मराठी भाषेमध्ये ब्लॉग लेखन कसे करावे ?ब्लॉग कसा तयार करावा? त्यावर कसे व्यक्त व्हावे? यासाठी पैसे लागतात का? याबाबत मराठी माणसांमध्ये फारसी माहिती दिसत नाही. मराठी ब्लॉग वर लेखन कसे करावे हे समजून घेण्यासाठी प्रगती सार्वजनिक वाचनालयाच्या पुढाकाराने मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून मराठी मधून ब्लॉग लेखनाची मोफत कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. जिजामाता महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. अशोक इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली तंत्रस्नेही शिक्षक संदीप राऊत, देविदास गोसावी, आणि अरविंद शिंगाडे हे ब्लॉग लिखाणाबद्दलची तांत्रिक माहिती प्रात्येक्षीकांसह मराठीमधून देणार आहेत .कार्यशाळेला येताना अँड्रॉइड मोबाईल सोबत असल्यास उत्तम. बुलडाणा शहरात प्रथमच ब्लाॅग लेखनाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या मराठी ब्लाॅग लेखन व निर्मिती कार्यशाळेचा लाभ बुलडाणा परिसरातील जास्तीत जास्त लेखक ,कवी , सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, पत्रकार ,युवा, रसिक- वाचकांना नी अवश्य लाभ घ्यावा अशी आवाहन प्रगती सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने संंस्थेच्या अध्यक्षा अरूणाताई कुल्ली आणि सचिव नरेंद्र लांजेवार यांनी केले आहे.


0 Comments:

Post a Comment

आपल्या प्रतिक्रिया आम्हाला बळ देतात .

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home