Wednesday, October 28, 2015

तंत्रस्नेही शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा

💿💿तंत्रस्नेही शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा दि.27 व २८ ऑक्टोंबर 📀📀
🎈 💻जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, बुलडाणा💻🎈
पहिला दिवस (दि 27.10.2015)

       🔵प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम २०१२ मध्ये प्रस्तावनेतच म्हटले आहे की शिक्षकाची भूमिका बदलून ती 'सुलभकाची' झालेली आहे. शिकणे सोपे व्हावे, ओझे कमी व्हावे व अध्ययनासाठी विविध व विपूल शैक्षणिक साधनांचा वापर कल्पकतेने व्हावा. जग झपाट्याने बदलते आहे. तंत्रज्ञान गुणाकाराच्या पटीत बदलत आहे. आपला शिक्षक मात्र या वेगात मागे पडतो आहे.शैक्षणिक साधन म्हणून तंत्रस्नेही होणे गरजेचे आहे.  महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या सूचनेनुसार techonoteacher.in या वेबसाईट नोंदणी केलेल्या शिक्षकासाठी  जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था बुलडाणा येथे गरजेनुसार  २दिवसांची कार्यशाळा आयोजित  करण्यात आली
     🔵  राज्यस्तरावरील तंत्रस्नेही कार्यशाळेत सहभागी शिक्षकांना आपले ज्ञान जिल्हास्तरावर संप्रेषित करण्यासाठी हे आयोजन करण्यात आले.
       🔴कार्यक्रमाचे उद्घाटन मा.प्राचार्य कांबळे सरांनी केले, प्रास्ताविक मा.डुकरे सरांनी केले. कांबळे सरांनी आजचा विद्यार्थी वसमाज कसा तंत्रज्ञान वेगाने स्वीकारतो आहे हे स्पष्ट केले. शिक्षक तंत्रस्नेहीच नव्हे तर 'तंत्रसेवी ' सुद्धा झाला पाहीजे, हे स्पष्ट केले. तंत्रस्नेही चळवळीत उपक्रमशील शिक्षकांनी दिलेले योगदान कसलेही तांत्रिक शिक्षण न घेताही किती क्रांतिकारक आहे हे स्पष्ट केले . इच्छाशक्ती व दृष्ट्या अधिका-यांच्या साथीने महाराष्ट्र शिक्षण पद्धतीत क्रांती घडवून आणेल असा विश्वास मा.कांबळे सरांनी व्यक्त केला. एक ' संदीप गुंड' नव्हे तर प्रत्येक शाळेत 'संदीप गुंड' (digital school pastepada )बनले पाहीजे असे आवाहन सरांनी केले मोबाईल चा शैक्षणिक उपयोग मान्य करणारे व शिक्षकांना सतत ऊर्जा देणारे मा.प्रधान सचिव नंदकूमार साहेब यांचे स्फूर्तीदायक मनोगत (DCPS Buldana प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र आढावा बैठक) प्रोजेक्टर वर संकलित रुपात दाखवण्यात आले. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रासाठी तंत्रज्ञान कसे वापरता येईल यावर कांबळे सरांनी प्रकाश टाकला.
🔵मा. डुकरे सरांनी " एखादी गोष्ट सर्वसामान्य होते तेव्हा त्यातलं नाविन्य संपून ती सहज होते" असे सांगत मुलांना mobile, laptop मुक्तपणे का हाताळू द्यावं ते सोदाहरण सांगितले.                                                                        🔵उपस्थित तंत्रस्नेही शिक्षकांनी अल्प परिचय व कार्यशाळेला का आलो ते सांगितले. तद्नंतर मुख्य मार्गदर्शक मा.नादरकर सर  यांनी सुत्रे हाती घेतली. कार्यक्रमाचे स्वरूप व वेळेचे नियोजन प्रोजेक्टर वर स्पष्ट केले.
     🔵प्रथम दिवस - part A- Mobile या विषयांतर्गत 1)whatsapp 2) email 3)memory card 4) internet 5) apps part B- video editing असे नियोजन केलेले होते.
      🔵 मोबाईल चा social media माहिती केवळ share करण्यासाठी नव्हे तर एकप्रभावी मंच म्हणूनही करता येईल. माहित नसलेले, शंका असलेले whatsapp चे नवनवे उपयोग मार्गदर्शक व उपस्थित शिक्षकांनी सोपेपणाने स्पष्ट केले. Whatsapp चा डाटा कसा बँकअप घ्यावा? मेसेज broadcast कसे करावे?
Whatsapp web ने computer वर कसे whatsapp वापरावे? अशा व अनेक प्रश्नांची  माहिती आंतरक्रियेतून अधिक स्पष्ट झाली.
      🔵 Gmail, browser, YouTube, व स्वत: video बनवणे हे प्रात्यक्षिकासह स्पष्ट करण्यात आले. मोबाईल चा उपयोग करून अतिशय सुरेख video उपस्थित शिक्षकांनीकरून दाखवले. Slideshow, video effects यांचे apps व software यांची देवाणघेवाण झाली.
🔵मार्गदर्शन  रविंद्र नादरकर  व  डी बी  कुटे यांनी केले
     🔵वेळेचं अक्षरशः भान हरवून पहिला भरगच्च दिवस पूर्ण झाला. मन:पूर्वक धन्यवाद!!!!!                                                                                                                       💿💽शब्दांकन  💽📀                             
       संदीप विष्णू राऊत, पं स बुलडाणा जि बुलडाणा

Monday, October 19, 2015

विस्तार अधिकारी नव्हे प्रेरणा अधिकारी

विस्तार अधिकारी नव्हे प्रेरणा अधिकारी 

  विविध नमुन्यातले माहितीचे संकलन... सर्व शिक्षण मोहीम आणि इतर निरनिराळ्या प्रशिक्षणांची अखंडित मालिका... कनिष्ठ-वरिष्ठांच्या मिटींग्ज... सरकारी योजनांचा आढावा नियोजन... सध्या राज्याच्या शिक्षण विभागात कार्यरत पर्यवेक्षकीय यंत्रणेतील बहुतांश अधिकारी याच नेहमीच्या जंजाळात अडकलेले दिसतात. किंबहुना ‘भूमिकावादा’च्या चक्रव्यूहात फसलेल्या अभिमान्यूसारखी त्यांची केविलवाणी अवस्था झालेली दिसते! मग शाळा भेटीच्या वेळी विद्यार्थी-शिक्षक हजेऱ्या, टाचण वह्यांवर सह्या करायच्या. इतर अभिलेखे तपायचे. शेरेबूकात शेरा लिहून पुढे व्हायचे. बस्स! झाली शाळा भेट!! शाळांमध्ये गेल्यावर वर्गात जाऊन तिथे काय आणि कशा पद्धतीचे कामकाज सुरू आहे? शिक्षकांच्या कामाची दिशा योग्य आहे की नाही? मुलं नीट शिकताहेत का काही अडचणी आहेत? आणखीन बरेच काही... याबाबत बहुतांश अधिकारी मंडळी फारशी जागरूक दिसत नाहीत, असेच म्हणावे लागते. समजा, याविषयी विचारलेच तर शाळेच्या अन् मुलांच्या अंतरंगात डोकवायला वेळ आहे कोठे? असा प्रतिप्रश्न उपस्थित केला जातो. सातारा जिल्ह्यातल्या कुमठे विभागाच्या (बीट) शिक्षण विस्तार अधिकारी प्रतिभा भराडे याला पूर्णपणे अपवाद आहेत.
      सगळी मुलं शाळेत आली पाहिजेत. आलेली मुलं शिकली पाहिजेत. त्यांना चांगल्या दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे. यासाठी झपाटल्यागत काम करणाऱ्या भराडे यांनी सरकारी चौकटीत राहून चौकटीबाहेरचे कामकाज करून दाखवलेय. त्यांनी स्वत:चे प्रशासकीय कामकाज व्यवस्थित सांभाळून, एक नेमकी दिशा पकडून विशेष नोंद घ्यावी, असे काम उभे केलेय. त्यांच्या बीटमधल्या चाळीसच्या चाळीस शाळांमधल्या मुलांच्या मनात यांनी ‘घर’ केलंय. सर्वच शाळांतली जवळपास सगळी मुलं त्यांना ‘भराडे मॅडम’ असं नावानं ओळखतात! यादेखील मुलांना नाव घेऊन हाक मारतात. हे एकाएकी किंवा सहजासहजी होत नाही. या बीटचे आगळेवेगळे वैशिष्ट्य म्हणजे विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, शिक्षक, मुलं, पालक आणि निरनिराळे समाजघटक असे सगळेजण मैत्रीच्या धाग्याने बांधले गेलेत. एकमेकांशी एकरूप झालेत. एक ‘शैक्षणिक कुटुंब’ असे याचे नेमके वर्णन करता येईल. भराडे यांच्या बीटमध्ये एकूण शाळा आहेत चाळीस. तेथे राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची संख्या आहे तब्बल सहासष्ट! मुलांना सर्वांगाने समृद्ध करणारे. वैशिष्ट्यपूर्ण असे. याचे कारण म्हणजे कोणासाठी करायचे? काय करायचे? कसे करायचे? याची स्पष्टता येथे काम करणाऱ्या प्रत्येकाकडे आहे. 
    २००३ मध्ये भराडे यांनी कुमठे बीटचा पदभार स्वीकारला. काहीतरी ‘वेगळं’ करायचं, असं त्यांच्या डोक्यात अजिबात नव्हतं. पण जे काम करतोय ते तळमळीनं, चिकाटीनं आणि प्रामाणिकपणानं करायचं, असा स्वभाव. जोडीला धडपडी वृत्ती. पदभार स्वीकारल्यावर शाळा आणि मुलांना समृद्ध करण्यासाठी काय काय करता येईल, असा विचार सुरु होता. ‘आजचं शिक्षण आयुष्यातले आर्थिक प्रश्न सोडवत नाही,’ असा शिक्षण पद्धतीवर मुख्य आक्षेप घेतला जातो. याबाबत काही करता येईल का? याबाबत चिंतन सुरु असताना शाळेत शेती सुरु करण्याचं ठरवलं. पण यातली मुख्य अडचण होती ती म्हणजे शेती आणणार कोठून आणि कशी? प्रत्येक शाळेला भेट द्यायची. मनोदय शिक्षकांना सांगायचा. गावकऱ्यांशी चर्चा करायची. मार्ग निघतो का बघायचं. असं सुरु असताना बघता बघता प्रत्येक शाळेला गुंठ्यापासून पाच गुंठ्यांपर्यंत शेती मिळाली! तीदेखील लोकांच्या सहभागातून. या गोष्टीची चर्चा सुरु झाली. ती सामाजिक कार्यकर्त्या शैला दाभोलकर यांच्या कानावर गेली. या कामी त्यांचं महत्त्वपूर्ण योगदान लाभलं. जी मिळाली ती जमीन काही काळी कसदार, सुपीक होती, असं काही नव्हतं. खडकाळ, माळरान, नापीक जमीन ताब्यात घेतली. मुलं राबू लागली. श्रमप्रतिष्ठा हे काही भाषण देऊन गळी उतरविण्याचं मूल्य नाही, ते प्रत्यक्ष काम करून अनुभव घेऊन अंगी बनवायचं असतं, हा धडा मुलं घेत होती. शेण-मलमूत्र-काडी-कचरा, तंबाखू, कडूनिंब अशा वनस्पतींचा पाला वापरून नैसर्गिक पद्धतीनं जमीनी लागवडीखाली आणल्या. उजाड, ओसाड माळरानावर तीन महिन्यात हिरवी पिकं दिमाखानं डोलू लागली. पिकविलेल्या भाजीपाल्याचा वापर मध्यान्ह भोजनासाठी केला जातो. मुलांनी स्वतः घाम गाळून पिकविलेल्या भाजीची चव न्यारीच लागणार! संपूर्ण शेती सेंद्रीय पद्धतीनं करतात. याचा परिणाम असा झाला की, मुलं घरीदेखील सेंद्रीय शेतीचा आग्रह धरू लागली. त्याचे फायदे-तोटे पटवून सांगू लागली. ‘No waste land, No waste child’ असं स्लोगन इथे बनलं आहे. मोलमजुरी करणाऱ्या एका गरीब कुटुंबातल्या विश्वजीत सूर्यवंशी नावाच्या सहावीतल्या मुलानं घराभोवतीच्या पाच गुंठे पडीक जमिनीत भाजीपाल्याचे उत्पन्न घ्यायला सुरुवात केलीय. सुरुवातीला ‘हे काय खूळ घुसलंय तुझ्या डोकस्यात?’ असं म्हणणारे आई-वडील मुलानं कष्टानं तयार केलेल्या शेतीत खपताहेत. उत्त्पन्न घेताहेत. त्यातून त्यांच्या प्रपंचाला हातभार लागतोय! आता बाप म्हणतोय ‘माझा मुलगा कमावता झाला.’ पर्यावारणस्नेही शेती कशी करावी, याबाबत येथील या ‘प्रयोगशील शेतकऱ्यांच्या’ आकाशवाणीवर मुलाखती झाल्यात! आपला देश कृषिप्रधान. पण तो केवळ बोलण्यापुरताच. शेतकऱ्याला या देशात जी काही हिणकस दर्जाची वागणूक दिली जातेय, त्यातून श्रमाचं किती ‘अवमूल्यन’ झालंय ते दिसतंय. ‘उत्तम’ शेतीची वाट लागल्याचं चित्र दिसत असताना अशा नकारात्मक वातावरणात शेतीविषयी मुलांमध्ये प्रेम निर्माण करणं, त्याचबरोबर विज्ञान, पर्यावरण शिक्षण आणि नोकरीला पर्याय म्हणून शेतीकडं पाहण्याचा दृष्टीकोन मुलांमध्ये संस्कारक्षम वयात रुजवण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम इथे सुरु आहे. ‘जीवन आणि शिक्षण’ यांचा मेळ कसा घालायचा, असा प्रश्न पडलेल्या जिज्ञासूंनी खुशाल इथं जावं. पाहावं. समजून घ्यावं. २००४मध्ये सर्व शाळांमधल्या तब्बल ४ हजार विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली. दृष्टीदोष आढळलेल्या एक हजार मुलांना चष्मे दिले. त्यात ३० मुलांना डोळ्यांचे गंभीर आजार असल्याचं निष्पन्न झालं. सामाजिक कार्यकर्ते गनीभाई यांच्या मदतीनं सर्व मुलांच्या डोळ्यांवर पुण्यात शस्रक्रिया केल्या. मुलांना नवी दृष्टी मिळाली. शिक्षकांची बांधिलकी उरली नसल्याची टीका आज शिक्षकांवर होतेय. इथल्या मुलांना तिकडं न्यायला आणायला शिक्षकांनी स्वतःच्या गाड्या दिल्या होत्या. इतर काही आजार झालेल्या मुलांना तपासणी आणि उपचारासाठी डॉ. एच. व्ही. देसाई यांच्याकडे नेलं. त्यांनी उपचार केले. परंतु मुलांमध्ये कुपोषणाचं प्रमाण मोठं असल्यानं आजारांची गुंतागुंत वाढत असल्याचं कारण सांगितलं. तिकडून आल्यावर कुपोषण निर्मूलनाचा कार्यक्रम सुरु झाला. अर्थातच तज्ञांची मदत घेतली. जे घटक कमी पडतात, ते ज्यातून मिळतात त्यां भाज्या शेतीत पिकवायच्या. शाळेतच शिजवायच्या. दुपारच्या जेवणात खायच्या. अजून काही गोळ्या औषधे दिली. कुपोषण बऱ्यापैकी आटोक्यात आलंय. हिमोग्लोबीन वाढविण्यावर भर दिला जातोय. वेगवेगळ्या अंगांनी काम पुढं जात होतं. शिक्षक आणि मुलांशी संवाद सुरु होता. भराडे यांनी स्वतःच्या मनाची कवाडे उघडली. मुलांच्या भावविश्वात डोकावल्या. काही मुलांचं भावविश्व पूर्णपणे पोखरलेलं असल्याचं त्यांच्या तरल आणि संवेदनशील नजरेतून सुटलं नाही. कोणाला आई-वडील नाहीत, कोणाला आजारांनी ग्रासलेलं. कोणाला घराची मंडळी मजुरीला पाठवतेय म्हणून शाळेत येणे शक्य होत नाहीये. कोणाला लिहिता येतंय, पण वाचता येत नाहीये. कोणाला निबंध लिहिता येत नाहीये. कोणाचे अक्षर चांगले येत नाहीये. नापास होण्याची भीती कुणाला तरी सतावतेय... जेवढी मुलं तेवढे प्रश्न! आतून बाहेर हलवून सोडणारे... अस्वस्थ करणारे... मुलांच्या विशेष गरजा होत्या. त्या लक्षात घेऊन मुलांना ‘समजून’ घेणं सुरु झालं. मातेच्या ममतेनं कोणाच्या गालावरचे अश्रू पुसले. कोणाला कुशीत घेऊन समजूत काढली. कोणाच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकली. कोणाला कडेवर उचलून घेतलं. त्यांच्या ‘पारख्या’ नजरेतून काही म्हणजे काहीच सुटत नाही. मुलांचे केस, दात, नखं, कपडे, अंघोळ इथपासून आज कुणाचा चेहरा पडलेला आहे. कोणाची कळी भलतीच खुललेली आहे... इथपर्यंत भराडे लक्ष पुरवतात. त्यांच्या या अनुभव संपन्नतेतूनच ‘कवाडे उघडताच’ हे पुस्तक आकाराला आलेय. मल्लिका पाटणकर, राजश्री देशपांडे आणि हमीद दाभोलकर हे मानसोपचार तज्ञ मदतीला आले. सर्व मुलांचा बुद्ध्यांक तपासला. संपादणूक पातळी कमी असलेल्या मुलावर सक्ती केली जात नाहीत. ते जिथं रमतील तिथं रमण्याचं ‘स्वातंत्र्य’ त्यांना असतं. भराडे यांनी मानसशास्त्राचा अभ्यास करण्याच्या आणि मुलांना समजून घेण्याच्या हेतूनं एक डिप्लोमा केला. त्यातून आयुष्याकडं पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. अधिकारीपदाची ‘झूल’ आपोआप गळून पडली! शिक्षकांसमोर खरोखरच काही अडचणी, प्रश्न उभे असल्याचं दिसलं. तेव्हा त्या स्वतः त्यांच्या मदतीला धावून गेल्या. ‘बॉसगिरी’पेक्षा एक सहकारी म्हणून काम करण्याला प्राधान्य दिलं. शिक्षकांना विश्वासात घेतलं. त्यांच्यावर विश्वास टाकला. तर काय होऊ शकतं, याचा वस्तूपाठ भराडे यांनी प्रत्यक्ष कामातून दाखवून दिलाय. लेखक आणि गट शिक्षण अधिकारी नामदेव माळी यांच्यासोबत काम करताना समज विकसित होत गेल्याचे त्या आवर्जून सांगतात. गेल्या काही वर्षांपासून शिक्षणाचे संदर्भ बदलताहेत. नवे परवाह येताहेत. रचनावाद आता परवलीचा शब्द बनलाय. या शैक्षणिक वर्षापासून भराडे यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात पहिलीपासून ज्ञानरचनावादी पद्धतीने संपूर्ण कामकाज सुरु केलेय. म्हणजे असं की, शिक्षकांनी ‘शिकवायचे’ नाही. मुलांना ‘शिकण्या’स मदत तेवढी करायची! सुलभकाच्या भूमिकेत शिक्षक दिसताहेत. दर शनिवारी शाळेत आठवडे बाजार भरतो. पहिलीची मुलं विक्रेते असतात. मोठी मुलं त्यांना मदतीला असतात. शाळेच्या शेतातला भाजीपाला आणि गोष्टी विक्रीसाठी ठेवलेल्या असतात. सारे गावकरी बाजारकरू! पालक काही तरी खरेदी करताना कौतुक भरल्या नजरेनं हे सगळं पाहात असतात. वीस रुपयांपर्यंतचा व्यवहार ही मुलं इतक्या लहान वयात आत्मविश्वासाने करताहेत. दोनशे रुपयांपासून एक हजारापर्यंत बाजारापर्यंतची ‘उलाढाल’ येथे होते. गणिती क्रिया, व्यवहार ज्ञानासोबत आपली बाजू सामोर्च्यला पटवून देणं, नम्रतेनं वागणं, माणुसकी, संवेदनशीलता असं बरेचसं ‘शिक्षण’ तेही अनुभवातून होतंय! आलेल्या पैशांतून गरजू मुलांना मदत केली जाते. कोणी लेझीम पथकाचा युनिफॉर्म घेतला तर कोणी आणखीन काही. अशाप्रकारे शाळांची छोटी-मोठी गरज यातून भागवली जाते. Activity based पद्धतीने कामकाज सुरु झालेले बहुदा हे राज्यातले पहिलेच बीट असावे! गट पद्धतीचा वापर, प्रश्न निर्मिती, स्वाध्याय कार्ड, झांजपथक, लेझीमपथक, एरोबिक्स, दोरी उड्या पथक, लगोरी, गोट्या, जिभल्या अशा पारंपारिक खेळांना प्रोत्साहन, विचारा तुम्ही सांगतो आम्ही, बालसभा, आठवड्याला प्रत्येक वर्गाची प्रश्नमंजुषा यासोबत ‘पीपल्स अॅक्शन फॉर लाईफ सेविंग’(‘पाल्स’) या उपक्रमात मुलं खाऊच्या पैशातून बचत करून त्यातून एखाद्या गरजू मुलाला मदत करतात. त्याचे नियोजन तेच करतात. ‘वही वाचवा’सारख्या उपक्रमात मुलांना समासापासून लिहायला जाते. त्यातून एका वहीत २० पाने वाचतात. दहा वह्यांमध्ये एक वही वाचते! पर्यावरणासारख्या विषयावर निबंध आणि भाषण स्पर्धा घेण्यापेक्षा तोच विचार बालमनावर असा कृतीतून रुजवला जातोय. जपान, अमेरिका, स्वीडन येथील अभ्यासकांनी शाळांना भेट देऊन येथील प्रयोग समजून घेतले. कॅलेलिना या अमेरिकेतल्या मान्यवर शिक्षणतज्ञ ज्ञानरचनावाद या विचारधारेवर ३० वर्षांपासून काम करीत आहेत. त्यांनी नुकतीच भेट देऊन बारकाईने कामकाज समजून घेतलं. खूप प्रभावित झाल्या. जाताना त्यांनी प्रतिभा भराडे यांना थेट मिठीच मारली! दर महिन्याला कामाचा आढावा घेतला जातो. विशेषतः सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाबाबत आढावा आणि नियोजन होतं. यश-अपयश बघून पुढचे पाऊल टाकलं जातं. शिक्षकांमध्ये परस्पर सुसंवाद आणि निकोप आणि विधायक स्पर्धा निर्माण झालीय. त्यातून शाळा आणि पर्यायानं मुलंही समृद्ध होताहेत. ज्या शाळेचे कामकाज चांगले असेल किंवा एखाद्या बाबीसाठी गरज असेल तेव्हा त्यांना केंद्रप्रमुख स्वतःच्या खिशातून हजार रुपयाचे बक्षीस/मदत देतात. शिक्षकांनी स्वतःच्या पैशातून शाळा सजवल्यात. कोणीही अधिकारी आला तरी शिक्षकांच्या मनावर तणाव नसतो. त्यांची धावपळ होत नाही. शांत चित्तानं त्याचं काम सुरु असतं. शाळेतील उपक्रमांची ते माहिती देतात. ज्या शिक्षकाकडे जे कौशल्य आहे ते वापरले जाते. चारही दिशांनी मदतीचा ओघ सुरु झालाय. ‘लोकांची मदत आणि समाजाचा विश्वास यामुळे आमची सगळ्यांची जबाबदारी दिवसेंदिवस वाढत आहे’, असे भराडे सांगतात. शिक्षकांच्या बदल्यांबाबत त्या खंत व्यक्त करतात. रुजवलेलं विरजण बाजूला जातं. नवीन शिक्षकाला सगळा प्रकल्प समजायला, त्याच्याशी जुळवून घ्यायला वेळ जातो. एका गोष्टीची त्यांना खात्री आहे, ती म्हणजे बदलून गेलेले शिक्षक मूळ विचारापासून बाजूला जात नाहीत. हे काम काही एकाएकी उभे राहिले नाही. उपक्रम आखायचे. शिक्षकांना विश्वासात घेऊन यशस्वीरित्या राबवायचे. प्रेरणा दिली की प्रेम मिळते असे त्या सांगतात. ‘ कोणाला तरी दाखवण्यासाठी(‘शो’साठी) काम करू नका. आरंभशूर तर अजिबात होऊ नका.’ सामाजिक कार्यकर्ते गनीभाई यांनी कधीतरी वडिलकीच्या नात्यानं दिलेला सल्ला मोलाचा आहे, असं भराडे सांगतात. ‘कधी मनाविरुद्ध घडलं, अपयश आलं तर निराशा येत नाही का?’ यावर त्यां म्हणतात आम्ही सगळ्यांनी ठरवलेलंच आहे की, काही झालं तरी थकायचं नाही. थांबायचं नाही. हिरमोड होऊ द्यायचा नाही. जे करायचं ते मन लावून. झोकून देऊन. गावोगावी तिथल्या समजात प्रभाव असलेल्या व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षकांची खंबीर साथ, पालक-मुलांचा उत्साह वर्धक प्रतिसाद, वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पाठिंबा यामुळे इथपर्यंत पोचता आलं, असं सांगत मदत करणाऱ्यांच्या प्रति कृतज्ञता त्या व्यक्त करतात. मला एकटीला हे शक्यच नव्हतं, असं त्या प्रांजळपणाने कबुल करतात. असं असलं तरी म्हणून त्यांच्या कामाचं मोल आणि महत्त्व कमी तसूभरही कमी होत नाही. राज्याच्या ग्रामीण भागात शिक्षण पुढे नेण्यासाठी धडपड करणाऱ्या महिला बोटांवर मोजण्याइक्याच आहेत. प्रतिभा भराडे त्या साखळीतली कडी आहेत. नोकरीव्यतिरिक्त व्यसनमुक्ती, विद्यार्थ्यांचे समुपदेशन आणि कौटुंबिक हिंसाचार असं काम कोणत्याही अपेक्षेशिवाय त्या करीत राहतात. म्हणूनच तर त्या अधिका-यापेक्षा ‘पेड सोशल वर्कर’ (पगार घेणारी कार्यकर्ती) म्हणून जास्त भावतात!हेच काम कोण्या स्वयंसेवी संस्थेनं केलं असतं तर त्याचा केवढा उदोउदो झाला असता. पण पुन्हा इथं सरकारी क्षेत्राची हेटाळणी करण्याचा तोच दृष्टीकोन डोकावतो. खासगी ते चांगले आणि सरकारी ते टूकारच असणार, असंच आपल्याकडं अजूनही मानलं जातंय. गरज आहे हा झापडबंद दृष्टीकोन बदलण्याची. भराडे आणि सहकाऱ्यांचं काम तेच तर सांगताय...
 -शब्दांकन भाऊसाहेब चासकर, माहेर,रतनगड कॉलनी, नवलेवाडी, ता.अकोले, जि.अहमदनगर. Posted by तानाजी उ. सोमवंशी

Copied from blog, ज्ञानरचनावाद व कुमठे बीट

 ज्ञानरचनावाद व कुमठे बीट 


मुलं स्वत: शिकत आहेत...  सातारा जिल्हातील सज्जनगडाच्या पायथ्याशी काही गावं वसली आहेत. डोंगर -दर्‍यांच्या कुशीत वसलेल्या या गावांत जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. यांतील अडतीस शाळांत शिक्षकांच्या मदतीनं ‘रचनावाद’ राबवायचा असं मी दोन वर्षांपूर्वी ठरवलं. ‘मूल स्वत:च्या ज्ञानाची निर्मिती स्वत: करतं’ हे पुस्तकात वाचायला सुंदर होतं. पण शिक्षकानं किंवा गुरूनं शिकविल्याशिवाय कोणी शिकू शकत नाही हा मनावरचा संस्कार पुस्तकातलं हे वाक्य स्वीकारायला नव्हता. प्रत्यक्ष प्रयोग बघितल्याशिवाय त्या प्रयोगावर माझा विश्‍वास बसत नाही. सातार्‍याजवळच वाईमध्ये ‘भारत विद्यालय’ ही अरुण किर्लोस्कर यांची खाजगी शाळा रचनावाद राबवते असं कळल्यानंतर मी त्यांच्या परवानगीनं एका वर्गात तीन दिवस पूर्णवेळ ठाण मांडून बसले. स्वत: शिकणारी, न घाबरता बोलणारी, मुलांच्या दृष्टीनं सतत खेळणारी तर माझ्या दृष्टीनं सतत अभ्यास करणारी मुलं मला आव्हान देऊन गेली. शिक्षणक्षेत्रात काम करायचं असेल तर ‘मेंदू शिकतो कसा?’ हे कळलं पाहिजे हे याच शाळेत मला पहिल्यांदा समजलं. रचनावाद व मेंदूशिक्षण याबाबत दोन व्याख्यानं कुमठे बीटमधील १३८ शिक्षकांसाठी आयोजित केली. निम्मा वर्ग दोन तासात बर्‍यापैकी झोपला. एवढा गहन विषय त्यांना पेलेना. तरुण शिक्षक (मनानं) समजून घेण्याचा प्रयत्न करत होते. पण एकूणच अवघड दिसत होतं. ‘प्रयत्न तर करूया’ एक मन म्हणत होतं, तर दुसरं मन ‘आपण मुलांच्या आयुष्याशी तर खेळत नाही ना?’ अशा द्विधा अवस्थेत होतं. शेवटी शिक्षकांशी चर्चा करून, पहिलीचा नवीन वर्ग १४ जूनऐवजी १ मार्चलाच भरवायचा ठरवला. १ मार्च ते १ मे हे दोन महिने प्रयोग करू. प्रयोग अयशस्वी झाला तर जूनपासून ‘वर्तनवादी’ पद्धतीनं शिकवू असं ठरलं. मुलं शाळेत न येण्याची कारणं माहीत होतीच. शाळा व वर्ग यातलं वातावरण निरस असलं की मुलं, शिक्षक, समाज सगळेच शाळेपासून पळून जातात. त्यासाठी प्रथम शाळा सुंदर करायच्या ठरल्या. पहिली मोहीम शाळेला पांढरा शुभ्र रंग देणं, शाळा परिसरात खेळणी उभी करणं आणि गुरं न खातील अशी जास्तीजास्त झाडं लावणं. कामाला झटून सुरुवात झाली. रंग झाला, खेळणी उभी केली. दोन शाळांतली खेळणी दुसर्‍या दिवशी चोरीला गेली. वृक्षलागवडीचंही तसंच. जकातवाडी शाळेत झाडं लावली की नेहमीच कोणीतरी उपटायचं. यावर्षी रानटी झाडं लावली आहेत. आज शाळा हिरवीगार दिसते आहे. शाळेत बिनखर्चात खेळता येतील असे खेळ घ्यायचं ठरलं. वर्गात बांधून बसावं लागतं म्हणूनही मुलं शाळा सोडत असतात. त्यासाठी त्यांना हवं तेव्हा खेळायला द्यायचं. मुलं शिकत राहतील अशा खेळांची यादी तयार केली. सागरगोटे, गोट्या, काचाकवड्या, सूरपाट्या, कांदाफोड, आबाधुबी यांसारखे पन्नास खेळ, हस्तनेत्र समन्वय, शरीराचा समतोल साधता येणं, एकाग्रता वाढणं, बैठक वाढणं या गोष्टी मुलांना खेळातून साध्य करता आल्या. खेळातून ‘मेंदू-विकास’ही करता आला. निर्णय घेण्याची क्षमता वाढविण्यासाठी खेळाची खूपच मदत झाली. हे दोन महिने खेळ, परिसरअभ्यास, वर्गसजावट, रांगोळी काढणं, चित्र काढणं यांमध्ये गेले. मूल शिकतं कसं हे समजण्यास हे दोन महिने उपयोगी पडले. हा बदल शिक्षकांच्या दृष्टिकोनात होता. मुलांना मारायचं नाही, त्यांना लागेल असं बोलायचं नाही, त्यांच्यात चांगला बदल कसा घडतो हे बघत त्यांना प्रोत्साहन द्यायचं असं ठरवणं वेगळं आणि प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी करणं वेगळं. अंमलबजावणी करताना किती तारांबळ होते ते अनुभवलंं, कळलं. ‘हुशार’, ‘ढ’ हे शब्द अजूनही मनातून निघालेले नाहीत. पहिलं एक वर्ष तर ‘असं बोलायचं नाही’ असं एकमेकांना सांगण्यात गेलं. संयम हा गुण शिक्षकात असल्याशिवाय ‘रचनावाद’ राबवता येत नाही हे नक्की. मूल प्रत्येक गोष्ट स्वत: शिकेपर्यंत वाट बघणं ही खूपच त्रासाची गोष्ट होती. पण हळूहळू आम्हाला कळतंय की, ‘शिकताना चुकणं ही शिकण्याची पायरी आहे’. रचनावादाची तयारी करताना एकेका मुददयासाठी कोणकोणतं साहित्य तयार करावं लागेल याची यादी तयार केली. साहित्य तयार करण्यासाठी कच्चा माल एकत्र खरेदी केला. एकत्र बसून साहित्य तयार केलं. प्रत्यक्ष वापर करताना वेगळाच अनुभव आला. मुलांना स्वत:हून वाचता यावं यासाठी खूप कष्ट व खर्च करून पाच हजार ‘शब्दचित्र-कार्ड’ तयार केली. प्रत्यक्षात दीडशे ते दोनशे शब्द मुलांना व्यवस्थित वाचता आले की मुलं गोष्टीची पुस्तकं वाचू लागतात हा शोध नंतर लागला! ज्या शिक्षकांना ‘मूल स्वत:हून शिकतं’ हे समजलं तिथले वर्ग वेग घेऊ लागले. ऑगस्टपर्यंत पेन्सील-पाटी हातात दिली नाही तरीही मुलं गणन करू लागली. खडे, चिंचोके मणी यांच्या मदतीनं त्यांना व्यावहारिक गणितं पटपट येत होती. एखाद्या मुलाचं चुकलंच तर दुसरी मुलं मदत करत होती. शिक्षकांनी मुलांचं पूर्वज्ञान विचारात घेतलं, त्याचा फायदा मुलांइतकाच शिक्षकांनासुद्धा झाला. मुलांना माहिती होते पण शिक्षकांना माहिती नव्हते असे कितीतरी शब्द मुलं वर्गात सांगत होती. गोष्टीत लिहीत होती. मुलं धाडसी होत चालली होती. काहींना तो मुलांचा उर्मटपणा वाटत होता. माझ्या दृष्टीनं ती एकप्रकारे गुलामगिरीतून सुटका होती. रचनावाद राबवताना मला व माझ्या शिक्षकांना आमूलाग्र बदलावं लागलं. आज माझ्या बीटमध्ये ‘मुलं स्वत: शिकत आहेत.’ -शब्दांकन -प्रतिभा भराडे मँडम [विस्तार अधिकारी, कुमठे बीट, सातारा]
रचनावादावरील कुमठे बीट रचनावादी अध्ययन व अध्यापनासाठी सध्या संपुर्ण महाराष्ट्रा मध्ये सातारा जिल्ह्यातील कुमटे बीट पँटर्न गाजताेय सन २०१५-१६ प्रयाेगीक तत्वावर काही शाळा मध्ये हा प्रकल्प राबवीला जाणार आहे माझी शाळा त्यासाठी निवडली असुन त्याबाबत नुकतेच सातारा येथे प्रशिक्षण झाले त्यामध्ये प्रत्येक विषय कसा शिकवावा व मुलांना शिक्षकांनी शिकवण्याची गरज नसुन मुल निसर्गता शिकते फक्त शिकण्यासाठी याेग्य वातावरण निर्माण करून देण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे असे रचनावाद सांगताे कुमठे बीटामध्ये गेली तीन वर्ष ही अध्यापन पध्दती राबवली असुन ३९ शाळामध्ये १ही विद्यार्थी अप्रगत नाही ... ज्ञानरचनावाद म्हणजे काय ??? १)भराडेमॅडम= यांनी pptच्या सहाय्याने मेंदु शिकण्याचा अवयव आहे.शरीराच्या २% वजन असणार्‍या मेंदुस २०% प्राणवायु लागतो.मेंदु वाढ गर्भात ७०%,पहिल्या वर्षी १५%,तीन वर्षात १०%,बारा वर्षात ५%होते.जन्मतः१००अब्ज मज्जापेशी मेंदुत असतात.शिकणे नैसर्गिक आहे.सुखद अनुभवांनी मज्जापेशींना फुटवे फुटतात तर दुःखद अनुभवांनी मज्जापेशी नष्ट होतात.मुलास तु चांगला आहेस गोड आहेस असे प्रबलन देत रहाणे मेंदुविकासास महत्वाचे आहे.आपण वर्तनवादी पध्दतीचे गुलाम आहोत.गणित सोडवण्याच्या पध्दती सांगु नये मुलांनी शोधायला हवे.मुलांस भीती वाटते तेव्हा न्युरोकार्टिक्सकडुन भावनिककडे प्राणवायु पुरवठा होतो खंडित पुरवठा सतत होणारी मुले उपद्रवी बनतात.मुलांस आनंददायी वातावरणात शिक्षण चांगले होते. इंग्रजी भाषा instruction 400अर्थासह संग्रहित केल्या.रोज १०सुचना देणे.Genral question 150 संकलित केले परिपाठावेळी 5प्रश्न विचारणे.तसेच Myselfप्रमाणेMy friend My School My Teacher घेणे.स्वयंअध्ययनकार्ड flashcard रोज 5 घेणे.dictionary मधुन शब्द शोधण्याचा खेळ घेणे.नेटवरुन भरपुर rhymes घेणे.word puzzelsवone word one sentence one question असा शब्दावरुन वाक्य सांगणे प्रश्न तयार करणे.अशा गोष्टी सातत्याने घेणे. वर्गतयारी मार्चपासुन पहिली वर्ग सुरु मुले खेळण्यात रमतात.सोपी बडबडगीते घेतो. उपक्रम=१)मोठ्या चित्रांची पुस्तके पहाणे चित्रवर्णन करणे.२)चित्रगप्पा मारणे३)आठवड्यातुन एकदा ठरवुन गप्पा मारणे.४) न ठरवता गप्पा मारणे.५)वाचनासाठी चित्रशब्दवाचनएकत्र नंतर फक्त चित्रवाचन व नंतर फक्त शब्दवाचन = पाचचित्रकार्डसंच लागोपाठ दोन दिवस द्यावेत.संयम ठेवावा.६)चित्राशी शब्द जोड्या लावणे खेळ घेणे.प्रत्येक विद्यार्थ्यास स्वतंत्र संच हवा. हिमोग्लोबीन कमतरतेचा मेंदुवर बौध्दीक क्षमतेवर परिणाम होतो.यासाठी कुमठे बीटात सर्व शाळांत सेंद्रियशेती केली जाते कसदार माती बनवली जाते त्यातील भाज्या शालेय पोषण आहार टाकल्या जातात. मराठी विषय. शाळा मुलांसाठी आहेत अधिकारी आलेतरी मुले कामांत मग्न असतात.सप्टेंबरपर्यंत मुले वाचु लागतात. उपक्रम=१)रोज नवीन अक्षराचे शब्दचक्रवाचन घेणे.त्यातील आवडीचा शब्द घेवुन शब्दावरुन वाक्ये बनविणे. २)शब्दभेंड्या खेळ घेणे.३)वाचनपट(शब्दडोंगर)बनवणे. लेखनाचे उपक्रम १)धुळपाटीवर लेखन २)हवेत अक्षर गिरविणे.३)समान अक्षर जोड्या लावणे.४)अक्षर आगगाडी बनवणे.५)पाहुणा अक्षर ओळखणे.६)चित्रशब्द वाक्यवाचन करणे.७)बाराखडीवाचन करणे.८)बाराखडीतक्तेवाचन करणे.९)स्वरचिन्हयुक्त शब्दांचे बाॅक्समधील ५०० शब्द वाचणे.१०)थिमनुसार शब्दचक्र बनवणे.११)कथालेखन करणे.१२)कवितालेखन करणे.१३)चिठठीलेखन करणे.१४)संवादलेखन करणे.१५)मराठी शब्दकोशात शब्द शोधणे. गणित १)खडे मोजुन घेणे,एकमेकांचे मोजणे२)वर्गातील वस्तु मोजणे३)अवयव मोजणे४)कार्डसंख्या पाहुन वस्तु मांडणे५)कार्ड घेवुन गोलात फिरणे नाव घेणाराने आत जाणे.६)आगगाडी तयार करणे७)दोघींनी मिळुन संख्या बोटावर दाखवणे.८)माळेवर मणी मोजुन संख्या दाखवणे.९)अंकाची गोष्ट सांगणे.१०)बेरीज व्यवहार मांडणी शाब्दीक व अंकी करणे.११)बेरीज उभी आडवी मांडणी करणे १२)चौकटीची जागा बदलुन उदाहरण सोडवणे.१३)बेरीजगाडी तयार करणे.१४)अंकांपुढे वस्तु मांडणे १५)गठ्ठे सुट्टे सांगणे१६)मणीमाळेवर १ ते १०० संख्यावाचन रोज ४ वेळा घेणे. Posted by तानाजी उ. सोमवंशी

Tuesday, October 13, 2015

महत्वाच्या sites (courtesy whatsapp )

काही महत्वाच्या वेबसाईट शिक्षकांच्या कामाच्या
👇👇👇👇👇👇👇👇
1)www.sahaygiri.com
2)www.navnirmitilearning.org
3)www.majalgaonbrc.com
4)www.baljagat.com
5)www.shikshakkatta.blogspot.in
6)networkedblogs.com
7)www.mahazpschool.blogspot.in
8)joshworth.com/dev/pixelspace/pixelspace solarsystem.html
9)http://www.learningwhiledoing.in/
10) www.shiksha.com/

11)http://study.taaza.com/
12)http://www.meracareerguide.com/
13) www.inmyschool.in/
14)http://boltipustake.blogspot.in
15 http://www.teachersofindia.org/
16)http://www.whereincity.com
17)www.majalgaonbrc.com
18)www.avakashvedh.com
19) http://www.quest.org.in/
20)http://marathidesha.com
21)www.zpkolhapur.gov.in
22)http://www.prajakt-zaware.blogspot.in
23)http://inmyschool.in
24)http://www.balbharati.in
25)www.swselearn.com
26)http://www.zpschoolmaliwada.com
27)www.virtualuniversity.com
28)http://www.mscert.net
29)www.killedar.org
30)http://ebooks.netbhet.com
31)www.swselearn.com
32)http://www.mscert.net
33)www.impnewszpgr.hpage.com
34)www.trgmdm.nic.in
http://mahanews.gov.in
35)www.ssa.nic.in
36)http://dgipr.maharashtra.gov.in                        
        37)www.mpsp.org.in
38)www.testsandtips.in
39)www.epapergallery.com
40)www.dise.in
41)www.indiacode.nic.in
42)http://www.academics-india.com
43)www.chandamama.com
44)www.popcornbreak.com
45)http://nagarzp.gov.in
46)http://www.dakhal.in
47)www.psvaijapur.com
48)www.first-school.ws
49)www.imd.gov.in
50)http://ecastevalidity.in
51)http://www.arvindguptatoys.com
52)http://ildc.inwww.mscepune.in
53)http://pragatshikshansanstha.org/
54) www.balajijadhav.in
55) www.santoshdahiwal.in
56) www.shikshakmitra.blogspot.in
57) www.zppsmaliwasti.blogspot.in
58) www.mahazpteacher.blogspot.in
59) www.mahaeducatenet.com
60) www.zpteacher.blogspot.in
61 ) http://www.khandagaletejal.com
62) www.kathabodh.blogspot.in
63) www.aadarshshala.blogspot.in
64) www.marathishala.in
65) www.mahazpteacher.blogspot.in
66) www.eshikshakbhoom.blogspot.com
67) www.shiksshansanvad.blogdpot.in
68) www.eshikshaka.blogspot.in
69)  http://www.zpguruji.com/

    70)  http://ezpschool.blogspot.in/
    71)   http://zppskingaon.blogspot.in/
72)http://elearningzp.blogspot.in/
73)http://dipakjadhav888.blogspot.in/
74)http://www.somnathwalke.in/
75)http://shikshansanvad.blogspot.in/
76)http://www.zppsganeshwadi.blogspot.in/
77)http://zppschikangaon.blogspot.in/
78)http://www.techgurumarathi.blogspot.in/
79)http://mahazpteacher.blogspot.in/
80)http://www.mahazpschool.blogspot.in/
81)http://www.shikshanmitra.blogspot.in/
82)http://zpteacher.weebly.com/blog/1

Monday, October 12, 2015

Tanaji somvanshi यांचा उपयुक्त ब्लॉग

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
🌼🌼 महाराष्ट्र ॲडमीन पँनल प्रस्तुत उपक्रम🌼🌼
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

पायाभूत चाचण्या आता जवळपास संपल्या आहेत. आपणास आपल्या वर्गात एकही अप्रगत विद्यार्थी राहू द्यायचा नसेल, किंवा प्रगत विद्यार्थ्यांमध्ये किमान 10% गुणवत्तावाढ नोंदवायची असेल तर ही लेखमाला वेळ देऊन अवश्य वाचा.

🎄🎄🎄🎄🎄🎄🎄
🎄चला बनवूया प्रगतवर्ग🎄
🎄🎄🎄🎄🎄🎄🎄

🔆🔆🔆🔆🔆🔆🔆
🔆उपक्रमांची मांदीयाळी-[अंक- तिसरा, भाग-4]🔆
🔆🔆🔆🔆🔆🔆🔆

💢💢💢💢💢💢💢
💢 ज्ञानरचनावाद पध्दतीने वाचन कसे शिकवावे 💢
💢💢💢💢💢💢💢

🚧 ज्ञानरचनावाद पध्दतीने वाचन ढोबळमानाने एकूण सात टप्यात शिकविले जाते-

1. वाचन पुर्वतयारी
2. अक्षर ओळख
3. स्वरचिन्हे ओळख
4. जोडशब्द ओळख
5. वाक्यवाचन
6. परिच्छेद वाचन
7. आकलन

💡या पध्दतीचा उपयोग करण्यासाठी याच अंकातील या अगोदर प्रसिध्द झालेले लेख वाचणे आवश्यक. भाग-1 "वाचनाचे टप्पे" हा लेख वाचा.
👇
http://tanajisomwanshi.blogspot.in/p/blog-page_92.html?m=1

💡भाग-२ व ३.
"वाचन पुर्वतयारी व अक्षर ओळख"
हे लेख उपक्रमाच्या फोटोसह वाचा.
👇
http://tanajisomwanshi.blogspot.in/p/blog-page_82.html?m=1

🔴लेखमालेच्या या भागात दुसरा व तिसरा टप्पा पाहणार आहोत.
👇👇👇👇👇👇👇👇

🎯 स्वरचिन्हे ओळख 🎯

या टप्प्यात खालील प्रकारे स्वरचिन्ह ओळख करुन घ्यावी.

1⃣ प्रथम एक लक्षात घ्यावे की स्वरचिन्हे या फक्त खुणा आहेत. तसेच त्यांना काना, मात्रा, वेलांटी असे न सांगता 'आ, ए, ई' असे स्वरचिन्हयुक्त शब्द संबोधावेत.
उदा- 'शाळा' या शब्दातील दोन्ही अक्षरे 'कानायुक्त शब्द' आहेत, असे न संबोधता त्यांना 'आ' युक्त शब्द असे संबोधावे.

2⃣ 'अक्षरओळख' या टप्प्यात किमान 10-12 अक्षरांचे वाचन मुले करु लागली की शिल्लक अक्षरांचा सरावासोबतच आपला पुढील टप्पा "स्वरचिन्ह ओळख" सुरु करावा. हळूहळू स्वरचिन्हासह वाचनात मुले शिल्लक अक्षरे वाचन करण्यास शिकतात.

3⃣ स्वरचिन्हाचा सराव घेताना मुलाला जे स्वरचिन्ह सोपे वाटेल किंवा आवडेल ते अगोदर घ्यावे.
उदा- एका मुलास 'ए' स्वरचिन्हयुक्त शब्द वाचण्यास सोपे वाटतात तर त्याच प्रकारच्या शब्दपट्यांचे वाचन घ्यावे.परंतु या ठिकाणी कधीही 'क' वर मात्रा 'के' असे वाचन करुन घेऊ नये.पुर्ण शब्दाचे वाचन घ्यावे.
उदा- केक, केर, केस, इ.

4⃣ एकाच स्वरचिन्हाचे चांगले दृढीकरण होईपर्यंत सराव घ्यावा. त्यासाठी पुढील उपक्रम राबविता येतात.

👉आकाराद्वारे स्वरचिन्ह लक्षात रहावे म्हणून त्या स्वरचिन्हाचे शब्द वर्तमानपत्र, इतर पुस्तके, उजळणी पुस्तके यातून कट करुन आणणे/ संग्रह करणे.
त्यांच्या वाचनाचा सराव घेणे.

👉 समान स्वरचिन्ह असणारा दुसरा शब्द शोधणे व त्याचे वाचन
उदा- 'चार' शब्दातील 'चा' या स्वरचिन्हाचा दुसरा शब्द [चाक, चातक, इ.] शोधणे व त्याचे वाचन

👉सारख्याच स्वरचिन्हयुक्त अक्षरांनी सुरुवात होणाऱ्या शब्दांची माळ तयार करणे. जास्तीत जास्त मोठी शब्दमाळ बनविण्यास प्रोत्साहन द्यावे.

👉 नंतर दोन गटात/मुलांमध्ये स्वरचिन्हयुक्त शब्दांच्या भेंड्या घ्याव्यात.
उदा- कार - रास - साप - पाढा - ढाल इ. असे.
[यामुळे मुळाक्षर व स्वरचिन्हयुक्तयुक्त अक्षर यांच्या उच्चारातील भेद हळूहळू मुलांच्या लक्षात येण्यास मदत होते.

👉 शब्दबँक - या बँकेत मुले दिलेल्या स्वरचिन्हयुक्त शब्दांचा संग्रह करतात.
उदा- 'आ' युक्त शब्दांचा संग्रह.
         यात इतर स्वरचिन्हासह असणारी आ युक्त शब्दही जमा करु द्यावीत.
उदा- मामी, मुलगा, कांदा, इ.
     यातील शक्य तितक्या शब्दांचे वाचन करण्यास प्रोत्साहन द्यावे. येत नसल्यास त्याला त्याचा वेळ द्यावा.
     अशी शब्दे जमा करण्यासाठी वर्तमानपत्रे, जूनी पुस्तके इ.चा उपयोग करावा. मुलांना अशी शब्द जमा करुन ठेवण्यासाठी रिकामी खोके उपलब्ध करुन त्यावर त्या मुलाचे नाव टाकून वर्गात ठेवण्यास जागा द्यावी. हे खोके म्हणजे त्याची शब्दबँक.

5⃣ आवडत्या स्वरचिन्हयुक्त शब्दाचे वाचन करु लागल्यावर त्यासोबतच मुले इतर स्वरचिन्हयुक्त शब्दाचे वाचन करु लागतात. त्यांना सोप्या वाटणाऱ्या स्वरचिन्हाचे वाचन हळूहळू करु द्यावे.

6⃣ या टप्प्यावर बहुतेक मुले सरावाने सर्व मुळाक्षरांचे वाचन करु लागतात.त्यांना आता मुळाक्षरांचे प्रत्यक्ष  लेखन करु द्यावे. त्यासाठी शक्यतो पाटी किंवा दुरेघी वहीचा उपयोग चांगला. मुळाक्षरे क्रमाने न घेता ती उलटसुलट वेगवेगळ्या क्रमाने घ्यावीत म्हणजे लवकर दृढीकरण होते.

7⃣ या टप्यात कोठेही बाराखडीचा [क, का, कि, की, कु... ज्ञौ, ज्ञं, ज्ञः अशी] परिचय करुन देऊ नये. व त्याचे असे वाचनही घेऊ नये.

8⃣ या टप्प्यात मुलांना शब्दासह विशेषण इ. लावून वाक्यांश बनविण्यासाठी प्रोत्साहित करावे.
उदा- ससा-  पांढरा ससा, गुबगुबीत ससा, छोटा ससा, मऊ ससा, इ. असे जास्तीत जास्त वाक्यांश बनविण्यास प्रोत्साहित करावे.

9⃣ स्वरचिन्हयुक्त चार-पाच शब्दांचे दृढीकरण झाल्यानंतर हळूहळू 'जोडशब्दाचे वाचन' सुरु करावे. याची माहिती पुढील लेखमालेत पाहू.

🐤 या टप्यात विद्यार्थ्यांच्या ज्ञानविश्वातील सहज सोपे भासणारेच शब्द घ्यावेत. त्याला अवघड वाटणारा  शब्दासाठी गडबड नको, त्याला त्याचा वेळ द्यावा.

🐌 वरील टप्यांचा उपयोग करताना घाई करु नये. एखाद्या टप्यात घाई झाल्यास विद्यार्थी त्यापुढील टप्यात गोंधळतात. याठिकाणी शक्यतो अपरिचित शब्द टाळावेत.

🐑 पुरेसा सराव व विविध पध्दतीचा/उपक्रमाचा अवलंब करावा, जेणेकरुन मुले कंटाळणार नाहीत व उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवतील.

🈸पुढील टप्पे पुढील लेखमालेत सविस्तरपणे पाहू!

🎏संदर्भ- कुमठे बीट उपक्रम

👉➡👉➡👉➡ क्रमशः

🔱तुम्हीही तुमच्या वर्गामध्ये असेच उपक्रम राबवत असाल तर आपले लेख, साहित्य फोटो, प्रतिक्रिया मला 9011104464 वर अवश्य कळवा. निवडक लेख व फोटोंना आपल्या नावासह ब्लॉगवर प्रसिध्द केले जाईल.

💻 असेच अनेक शैक्षणिक लेख वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगला भेट द्या.
www.tanajisomwanshi.blogspot.in

🔆 शिक्षकोपयोगी माहिती पुढे पाठवावी👉👉👉.

🙏🙏 विनंती 🙏🙏

यापुर्वीच्या अनेक लेखमाला अनेकांनी स्वतःचे नाव टाकून प्रसिद्ध कलेल्या आढळल्या.वरील उपक्रम हे कोणत्याही पुस्तकातून किंवा संकेतस्थळावरुन कॉपी करुन घेतलेली नसल्याने त्या बनविण्यास खुप वेळ लागतो. म्हणून विनंती की मुळ मेसेजमध्ये बदल न करता पुढे पाठवावा  🙏🙏

Sunday, October 11, 2015

ज्ञानरचनावाद अभ्यास दौरा - प्रेरणा

      ज्ञानरचनावाद अभ्यास दौरा - प्रेरणा 

कुमठे बीट, सातारा 

   मा प्रधान सचिव यांच्या बुलडाणा येथील आढावा बैठकीनंतर कुमठे बीट येथे अभ्यास दौरा निश्चित करण्यात आला. अधिकारी व पदाधिकारी यांनी दिलेल्या उत्साहाने शिक्षकही तयार झाले. मा केंद्रप्रमुख साहेब, DIET Buldana चे मा. प्राचार्य कांबळेसर मा. डूकरे सर, मा जि प उपाध्यक्ष व केंद्र सव येथील शिक्षक यांना घेऊन टिम कुमठे बीट साठी निघाली.
      कुमठे बीट च्या विस्तार अधिकारी भराडे madam यांना सर्वप्रथम भेट दिली. त्यांनी शाळांचा मार्ग सहज समजावा म्हणून आमच्या सर्व टिमसह एकेक शिक्षक उपलब्ध करून दिला.
       सातारा हाच मुळात निसर्गाच्या कुशीत वसलेला! त्यात कुमठे बीट च्या शाळा सज्जन गडाच्या पायथ्याशी. निसर्गाची लयलूट डोळे भरून पाहत आम्ही प्राथमिक शाळा शेळकेवाडी केंद्र शाळा कुमठे ला पोहचलो. सुदैवाने म्हणा की दुर्दैवाने, शाळेची वेळ सकाळच्या शाळेची होती.
       दारातच मुलांनी केलेले स्वागत, ढोल टाळ व अप्रतिम नृत्य यामुळे सावरत नाही, तोच दुसरा धक्का मुलांनी दिला. अॉफीस मध्ये अस्खलित इंग्रजी मधे वर्ग मंत्री शाळेचा परिचय करून देत होते. विभागनिहाय काम व कार्यपद्धती सांगत होते. मुलींचे प्रमाण मंत्रालयात अधिक. शाळेत मुख्याध्यापकांच्या कपाटापासून शाळेतील सनियंत्रण विद्यार्थ्यांना सोपवलेले होते. त्यांच्या चेह-यावरील आत्मविश्वास व आनंद पाहण्यासारखा होता.

       इ.१ली व ३री एकत्र बहूवर्ग मॅडम सांभाळत होत्या. वर्गात डेस्क बेंच नाही, कारण रचनावादासाठी गटपद्धत आवश्यक असल्याचं मॅडम सांगू लागल्या. मुले शाळेत येतात आणि खेळत शिकतात. चिंचोके, काड्या, नकली नोटा, खडे, मणी माळ, गोट्या हे शैक्षणिक साहित्य? आम्हाला अजून आश्चर्याचे धक्के देत मॅडम सांगू लागल्या. आम्ही पाढे पाठांतर घेत नाही, शिक्षक खुर्चीवर बसतच नाहीत, मुले शाळेत शेकडा १०० उपस्थित असतात, खिचडीत परसबागेतील सेंद्रिय भाजीपाला वापरतो. शिक्षक शिकवत नाहीत, मुले स्वत:च शिकतात, १४ अंकी संख्या वाचतात, ५-१० मिनीटात दिलेल्या २-३ शब्दांवर गोष्ट, संवाद, कविता बनवतात. जोडाक्षरे अचूक, अक्षरे पाणीदार ...आम्ही पाहतच राहिलो.
        मॅडम म्हणाल्या सर हाच ज्ञानरचनावाद ...!!!
इ१ली व३री ला शिकवणा-या शिक्षिकेचे ओघवते निवेदन व उपक्रम सांगणे सूरू असताना एक बाब माझ्या लक्षात आली की हे अतिशय नियोजनपूर्वक केलेलं आहे. साहित्याची निवड, मांडणी, सराव व उपक्रम यात कुठेही विस्कळीतपणा नाही. त्यांनी ते मान्यही केलं व सांगीतलं," सर ही चार वर्षांची तपश्चर्या आहे". प्रथम इ१ली पासून रचनावादी अध्यापन सुरू झालं, बीटस्तरावर संकल्पना समजावून सांगितल्या. पहिल्या बैठकांमध्ये सांगतोय त्यावर विश्वास बसत नव्हता, समजत नव्हतं. वर्षाअखेर यश स्पष्ट दिसायला लागलं आणि विश्वास निर्माण झाला.
ओघतक्तात मांडायचा प्रयत्न करतो 
ज्ञानरचनावाद > संकल्पना समजावून घेणे > सकारात्मक होणे > सत्रापूर्वी उपक्रम व साहित्यांचे संपूर्ण नियोजन > विद्यार्थ्यांच्या साहाय्याने शैक्षणिक साहित्य बनवून संग्रहीत करणे व व्यवस्थित मांडणी करणे> नियोजनाप्रमाणे ज्ञानरचनावादी पद्धतीने बहूस्तरावर घटक पूर्ण करणे.
शाळेतील शिक्षकांचे टाचण, नियोजन पाहण्याची खूप उत्सुकता निर्माण झाली होती. आम्ही मुद्दाम ते पाहिल्यावर लक्षात आले की, बीट स्तरावर सर्वांच्या विचारांनी व कल्पकतेने विविध खेळ, उपक्रम, साहित्य यांचा विचार आधीच करण्यात आलाय.
उद्दिष्टांना समोर ठेवूनच ( पाठ्यपुस्तकांना नव्हे) घटक नियोजन केलेलं आहे, टाचणही त्यावर आधारित. कसं करायचं याबाबतचं पुर्ण स्वातंत्र्य शिक्षकांना. साहित्यही स्वत पण टिकाऊ.
शाळा परिसरातील घटकांचा पुरेपूर उपयोग. खेळाच्या रुपातील अध्ययन अनुभव. पायाभूत घटक पूर्ण झाल्यावरच पुढील घटकाकडे वळायचे. सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या गतीनुसार स्तरानूसार जाऊ द्यायचे.एडगर डेलचा शंकू आठवतोय ? दृक किंवा श्राव्य पेक्षा प्रत्यक्ष अनुभव महत्वाचा.to be continue ...


Thursday, October 8, 2015

Kumathe bit Dist Satara, अभ्यास दौरा

Monday, October 5, 2015

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र

महत्वाच्या links
http://ezpschool.blogspot.in/?m=1
इयत्ता 1 ते 8 साठी प्रश्नसंच महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ( विद्यापरिषद), पुणे वेबसाईटवर
http://www.mscert.org.in/QuestionBank.aspx    

Labels: