Friday, March 1, 2019

आज 1 मार्चपासून काय बदल होणार?

💁‍♂ *आज 1 मार्चपासून काय बदल होणार?*

*LetsUp | Special*

आज शुक्रवार दि. 1 मार्चपासून अनेक बदल होणार आहेत. या बदलामुळे सर्वसामान्यांच्या आयुष्यात काय बदल होणार आहेत? त्याबाबत जाणून घेऊयात...

1) *'ई-रिफंड' सुरु* : प्राप्तिकर विभागातर्फे आज 1 मार्चपासून 'ई-रिफंड' देण्यात येणार आहेत. हे रिफंड (परतावा) संबंधित करदात्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत. यासाठी करदात्यांना आपले बँक खाते पॅन कार्डशी जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे

2) *PNBचं होम लोन स्वस्त* : PNBचं होम लोन 0.10 टक्के कमी झाले आहे. व्याज दर 8.55 टक्के होता, तो आता 8.45 टक्के झाला आहे.

3) *इलेक्टोरल बॉन्ड खरेदीसाठी उपलब्ध* : कुठल्याही राजनीतीक पार्टीला निधी देण्यासाठी आजपासून तुम्ही इलेक्टोरल बॉन्ड (Electoral Bonds) खरेदी करू शकता. ते SBIच्या 29 शाखांमध्ये मिळू शकतात.

4) *इलाहाबाद बँकेचं गृहकर्ज कमी* : इलाहाबाद बँकेनंही गृहकर्ज 0.10 टक्क्यांनी कमी केलंय. त्यानुसार आता नवे दर 8.15, 8.25, 8.45, 8.50, 8.65 आणि 8.95 टक्केआहेत.

5) *LIC पाॅलिसीची माहिती SMS वर* : LIC आता डिजिटल होत असून पाॅलिसीधारकांना सगळी माहिती आता SMSवर मिळू शकणार आहे. मात्र यासाठी तुमचा फोन नंबर रजिस्टर्ड असणे आवश्यक आहे. अन्यथा पाॅलिसीसंबंधीची माहिती यामुळे तुम्हाला मिळणार नाही.

📱 *फोन नंबर रजिस्टर्ड कसा करायचा?* :

▪ सर्वप्रथम तुमच्या एजंटशी संपर्क साधा. किंवा
▪ https://goo.gl/58C5ht यावर क्लिक करा आणि रजिस्टर्ड करा. किंवा
▪ 022-68276827 यावर काॅन्टँक्ट करा आणि रजिस्टर्ड करा.

🌐 _*इन्फोटेनमेंट असेल तुमच्या WhatsApp वर, लेट्सअप जॉईन करण्यासाठी क्लिक करा*_ : https://goo.gl/nJFz6w